" श्री सर्वोत्तम " चा वर्ष २०१६ चा दिवाळी अंक हा " उत्कृष्ट दिवाळी अंक "

  • 2017-06-26

मराठी वृत्तपत्र लेखक संघ , मुंबई या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी काही उत्कृष्ट दिवाळी अंकांना संघाचे मानचिन्ह आणि संघातर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येतो . " श्री सर्वोत्तम " चा वर्ष २०१६ चा दिवाळी अंक हा " उत्कृष्ट दिवाळी अंक " म्हणून निवडला गेला आणि रविवार दिनांक २५ जून २०१७ रोजी अंबरनाथ ( जिल्हा : ठाणे ) येथे संपन्न झालेल्या संघाच्या ५५ व्या राज्यस्तरीय संमेलनात , प्रा. दयानंद चोरघे , अध्यक्ष , भारतीय जनता पक्ष , ठाणे जिल्हा ( ग्रामीण ) यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले . संपादक श्री. अश्विन खरे अथवा कार्यकारी संपादक श्री.अरविंद जवळेकर हे उपस्थित राहू न शकल्याने , श्री सर्वोत्तम साठी नियमित लिहिणारे अंबरनाथ - निवासी लेखक श्री . प्रवीण कारखानीस यांनी " श्री सर्वोत्तम " च्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला , त्यावेळचे हे छायाचित्र -------( छायाचित्रात मध्यभागी संघाचे विद्यमान अध्यक्ष श्री रवींद्र मालुसरे दिसत आहेत )

Error message here!

Hide Error message here!

Forgot your password?

Lost your password? Please enter your email address. You will receive a link to create a new password.

Error message here!

Back to log-in

Close