सुंदर हे कोकण

  • माधवी करमळकर

कधी कधी अचानक असा काही प्रवासाचा योग येतो की त्याची कल्पना आपण केलीच नसते. ठरवून गोष्टी घडत नाहीत पण न ठरवता मात्र कधि-कधि असे प्रवासाचे प्रसंग जीवनांत येतात आणि आनंदाचे सप्तरंग जीवनांत भरून जातात.

मला अत्यंत आवडणारा भूभाग म्हणजे कोंकण, कोकणचं नैसर्गिक सौन्दर्य रसिकमनाला खरोखरच वेड लावणारे आहे नारळी पोफळीची गगनचुंबी झाडे आणि त्यांच्या सुंदर बनांत कोलारु घरं. कौलांचा लाल रंग आणि झाडांचा हिरवा रंग ह्या दोन रंगांची रंगसंगति निसर्ग सौन्दर्य द्विगुणित करत असते. उंच सखोल रस्ते लाल रंगाची मोहक माती, स्वच्छ नितळ निळ्या पाण्याचे समुद्र किनारे, दूरवरून येणारी धीर गंभीर समुद्राची तालबहर गाझ, आंब्याच्या झाडांनी नटलेली वन राई सर्वत्र हिरवळ जणूं कोकणांत पाचूचं पीक आल्या सारखं वाटतं आणि सर्वात् भावणारी गोष्ट म्हणजे साधी सरळ माणसं! आमचे पूर्वज ही कोकणातूनच मध्य भारतांत आलेत, ज्या वेळेस बाजीरावनं छत्रसालला लढाईत मदत केली त्या वेळेस छत्रसालने बुन्देलखंडा चा भाग आणि त्याची लावण्यवती कन्या मस्तानी ही बाजीरावला दिली. असे हे दोन अमूल्य `तोहफे' बाजीरावच्या शौर्याचा परिपाक होता. त्या मुळे मध्यभारतांत मराठी राज्य आले, पण आपली पाळेमुळे अजून ही कोंकणांत रूजलेली आहेत अशी मला जाणीव होते आणि कोंकणाशी आपले खूप जवळचे नाते आहे असे वाटते, कोंकण मला आपलेसे वाटते, तिथं गेलं कि माहेरी आल्या सारखं वाटतं.

आमची कुलदेवी कोकणांत तेव्हा मी तीन वेळा पूर्वी कोंकणांत राजपूरच्या जवळ हसोळ गांवी असलेल्या 'आर्या दुर्गाऽ देवीच्या दर्शनाला जाऊन आले, नंतर कांही वर्षापूर्वी असं कळलं की मूळची आर्यादुर्गा कर्नाटकांत अंकोला येथे आहे. मग तिच्या दर्शनाची मनाला ओढ लागली, एकदा रिझर्वेशन करवलं पण कन्फर्म न झाल्याने जाता आलं नाही, तिचे बोलावणे आल्याशिवाय कसे जाणार?

कांही वर्षापूर्वी पुण्याला गेले तेव्हां माझे मोठे दीर त्यांच्या मुलीकडे गडहिंगलजला होते. त्यांना विचारलं चलायचं का देवीच्या दर्शनाला? आणि दोनमिनिटातच फोनवर यात्रा कार्यक्रम ठरला. लगेच रिझर्वेशन ही मिळालं आणि आम्ही दोघं आणि एक माझी मामेनणंद असे तीघं दुसNया दिवशी कोल्हापूरला पोहोचलो. लगेच गडहिंगलजलाची बस मिळाली. साडे नऊला गडहिंगलजला पोहोचलो. चक्क उन्हं आणि स्वच्छ गांव खूप आवडलं. दोन दिवस तिथं होतो. मग सकाळी कोल्हापूर गाठलं, आता राजपूरची बस घ्यायची होती. पण त्या साठी दीड दोन तास अवधी होता, तेवढ्या वेळात अंबाबाईचे दर्शन घेतलं, बस गाठून संध्याकाळी पांच साडे पांच पर्यत राजापूर जवळील भूगांवला पोहोचलो, भात आमटी आमच्या साठी खास चपाती केली होती. कारण पूर्वी तीन वेळाआम्ही पाध्ये गुरूजीं कडेच थांबलो होतो तेव्हां आम्हाला पोळया लागतात हे त्यांना माहिती होतं. त्यांनी आठवणीने न सांगताच पोळ्या केल्या होत्या. सकाळी देवीदर्शनाला निघालो पूर्वी हसोळला संध्याकाळी एकच बस जात असे आणि सकाळी परत येत असे तेंव्हा देवळांत रात्र काढ्याची शिवाय तेंव्हा तेथे कांहीच नव्हतं. तिथं रात्री पिठलं भात करायचा, जेवायचं देवळांतच झोपायच आणि सकाळी परत यायच, पण आता भूगावांत बरेच आटोरिक्शा आले आहेत त्या मुळे देवळांत कोणत्या ही वेळेस जाता येत. पण पूर्वीचा आनंद वेगळाच होता. देवळाजवळं पांडवांनी तयार केलेली एक बावडी आहे पापNया उतरून जावं लागतं आणि पाण्याची चव तर एकदम `अमृत'! पण आता चव बदलली आहे, मंदिराच्या आवारांत नळ आहे. स्थान एकदम निर्जन एक घर नाही, एक झोपडी ही नाही. देवळांत भांडी चूल लाकडं सर्व आहे. आमचे गुरूजी वामनराव पाध्ये त्यांनी बेसन भात केला. मी त्यांना मी करते मी करते म्हणत होते पण त्यांनी मला करूंच दिलं नाही पण मी आपलं मधे-मधे त्यांना मदत करत होते चूलीवर मला स्वयंपाकाची सवय आहे. पण त्यांना माझं हे म्हणणं खरंच वाटत नव्हतं. जेवणानंतर देवळांत मोठा फर्श घातला मुली झोपल्या. बाहेर पिठूर चांदणं पडलं होतं. चाफ्याचा वास साNया आसमंतात भरला होता. आम्ही बाहेर झाडाखाली वसून एक दुसNया जगांत आल्याचा आनंद घेत होतो. गुरूजी म्हणाले रात्री वाघ येतो इथं आंत या बाहेर बसणं घोक्याचय, मी मात्र चारी बाजूला दृष्टी टाकून वाघ शोधू लागले. त्यानां आत्ताच माझ्या समोर यावं अशी मला तीव्र इच्छा झाली पण ती पूर्ण मात्र झाली नाही. एवंच त्या आदि शक्तिच्या अस्तित्वाची जाणीव होत होती. नितळ आकाशात असंख्य तारका आपल्या सौन्दर्यानं साNया जगाला आकर्षित करत होत्या. सगळं जग इतकं शांत आणि सुंदर भासत होतं. मानवी मनाला खरोखरच वेड लावत होतं. हे जग आहे तरी काय? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला लावणार होतं. त्या मागल्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आज मात्र रात्रीचं दर्शन नव्हतं सकाळीच आटो नं गेलो. दर्शन घेतलं ओटी भरली. ह्या वेळेस देवळांत कांही लोकं भेटले. आता तिथं राहण्याची सोय आहे. नवीन खोल्या बांघल्या आहेत. दूरवर माळरानाचं सुंदर दृश्य चारी बाजू नारळी पोफळी आंबा, कोंकणचं सौदर्य डोळे भरून बघत होते, बहुतेक रसिक. मनाला निसर्ग नेहमीच वेड लावतो आणि हे सौदर्य बघत नुसतं फिरत राहवं असं मला वाटतं. नंतर जवळच्या धूतपापेश्वरच्या मंदिरांत दर्शनाला गेलो. खूप सुंदर मंदिर राजापूरहून पायीच गेलो. रात्र झाली होती. गुरूजी पुन: म्हणाले या जंगलांत सुद्धा वाघ येतो आणि मी पुन. चारीबाजूला नजर फिरवली दिसतोय् का वाघ! देवीचं वाहन पण छे: मला भीती मात्र मुळीच वाटत नव्हती तो दिसावासा वाटत होता. थोडं वर जाऊन दत्त मंदिर आहे. ह्या दोन्ही मंदिरांच्या मघे पाण्याचा प्रवाह आहे. हे पाणी पहाडातून झिरपत होतं स्वच्छ नितळ! तासभर पाण्यांत पाय घालून मनसोक्त आनंद लुटला. दुसNया दिवशी राजापूरच्या बसस्टँड वर आलो. पावसला निघायचं होतं. बस येईपर्यंत तीन वेळा चहा प्यायलो असली अमृतसम चव मी हया पूर्वी चहाची कधीच अनुभवली नव्हती. फक्त चहा म्हणजे कलियुगांतलं अमृत असं मी नेहमी म्हणायची पण आज खरोखरच अमृत प्राप्त झालं चहाच्या रूपांत.

पावस हे कोकणांतलं अत्यंत पवित्र, सुंदर, स्वच्छ, शांत असं गांव आणि हे पावित्र्य प्राप्त झालं ते स्वामी स्वरूपानंदांमुळे. एकदा तरी प्रत्येकानं पावसाला जाऊन पावन व्हावं. कारण ही देवभूमि असल्याची प्रचीति येते. मी तर इतकी भारवले की आता इथून कुठच जाऊं नये आणि पुढचं आयुष्य इथंच काढावं अशी स्वप्न बधूं लागले. कुठे तरी शांत पवित्र स्थानांत आपलं उर्वरित आयुष्य जावं अस मला नेहमीच वाटतं. तिथं राहण्याची उत्तम सोय आहे. भक्त धाम देवळापासून जवळच आहे. स्वच्छ प्रशस्त परिसर कागदाचा एक चिटोरा ही नही. जेवण हवे असल्यास पूर्व सूचना द्यावी लागते. भक्त निवासांत भाडे नाही आपल्या इच्छेनुसार देगणी देवूं शकता.

पावसला विठ्ठल रखुमाईचे देऊळ अत्यंत सुंदर आहे. वर्णन करायला शब्द अपूरे पडतात, मूर्तीचा साज श्रृंगार चांदीचे मुखवटे चांदीची लखलख्ीत उपकरणी सम्पूर्ण गाभारा चांदीच्या सुंदर नक्षीदार पत्र्यांनी तयार केलेलं आणि अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित. त्या दिवशी भाग्याने आरतीचं ताट मला मिळालं तो आनंद एक वेगळाच होता. मंदिराच्या मागच्या भागात बNयाच देवांच्या मूर्ती आहेत. एकूण पावस मला फरच आवडलं कित्येक दिवस मनानं मी त्याच परिसरांत रहात होते. दुसNया दिवशी सकाळी काकडा आरती केली प्रसाद घेतला इच्छा नसतांना सुद्धा पुढच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळी पाचला गणपति पुळेला पोहचलो. बस मधून फिरतांना निसर्ग आपले अनेक रंग दाखवत असतो महाराष्ट्राच्या एसटी बसेस खूप चांगल्या आहेत. तिकिटाच्या रांगेत लागायच नाही. बस आली की बसायचं ज्या सीटवर तुम्ही बसाल ती तुमची नंतर कंडक्टर बस मध्येच तिकीट देतो. पूर्वी एकदा गणपतिपुळेला आले होते तेव्हां त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं. याची आठवण झाली. रूम शोधून सामान टाकलं आणि सरळ समुद्र गाठला. पाणी किती नितळं की दोन फूट खोल पाण्यांत सुद्धा खालची बाजू अगदी स्वच्छ दिसते. पाणी अगदी धुऊन-पुसून समुद्रांत भरलय, असं वाटतं, इतकं स्वच्छ पाणी कुठल्याच समुद्र किनाNयावर बघितलं नव्हतं. खूप रात्र झाली मगपाण्याचा मोह आवरला गणपतिचं दर्शन घेतलं. जेवून झोप काढली. सकाळी पुन्हा समुद्र मंदिर दर्शन करून रत्नागिरीची बस गाठली. त्या दिवशी जेवायला वेळच मिळाला नाही. साबूदाणा खिचडीवरच दिवस काढला. गणपति पुळेच्या समुद्र किनाNया वरची मऊ-मऊ वाळू. त्या वाळूंत पाय रूतवून येणाNया लाटांनी चिंब होणं, त्यांच्याशी खेळणं लहान मुलां सारखं शंख शिंपले गोळा करणं, माणूसाचं वय वाढल तरी कितीदा तो लहानच असतो, मनानं. आणि वागतो ही तसचं मुलां सारखा. निघतांना पुन्हा: पुन्हा: समुद्राकडे दृष्टि वळत होती, मन विचारत होतं बोलावशील का पुन: तुझ्या पाण्यांत खेळायला? या गणपति बप्पाच्या दर्शनाला? गणपति पुळेच्या प्रवेशद्वाराशी असणारे उंदीर मामा मला खूप आवडले. खूपच गोड आहे आजच्या भाषेत सांगयचं तर एकदम `क्यूट' आहे. पुन्हा एकदा समुद्रा कडे नजर वळली तो लाटांच्या ध्वनितून म्हणत होता नक्कीच बोलाविन या पुन्हा मला आणि गणपति बप्पांना भेटायला. तुमचे निरंतर स्वागत आहे.

रत्नागिरीला दुपारी एकच्या सुमारास पोहोचले, प्रत्येक बस स्थानकावर व्यवस्थित वेळा-पत्रक असल्या मुळे कुठंच त्रास होत नाही, कुडाळला मुक्काम करायचे ठरवले. बस निघायला दोन अडीच तासाचा अवकाश होता तेवढ्यात रत्नागिरी फिरून आलो, टिळकांचे घर बघून धन्य झालो, पतितपावन मंदिरांत गेलो आणि सावरकरांचे जीवन चरित्र डोळ्या समोर उभे राहयले. सारे आयुष्य फक्त देशासाठी समर्पित करणारी एक धन्य विभूति. सोळा हातांचा गणपति बघितला खरं तर तो `सहस्रबाहु' आहे. पण सोळा हातांची बघितली ही पहिलीच मूर्ति. आज पुन्हा जेवणाचे वांघे झाले, मग बेकरीच्या वस्तूंवर वेळ निभावली.

संध्याकाळी कुडाळला पोहोचलो. एक फॅमेलीरूम घेतली. अजून पर्यंत `भक्ति धाम' मधेच निवासाचा आनंद घेतला होता. कोकणांत जेवण मला खूप स्वस्त वाटलं २० ते २५ रूपयांत पूर्ण थाळी. भात आमटी भाजी, उसळ, पापड, दही, चपती सगळं अगदी रूचकर. घरच्या सारखं डोसा फक्त दहा रूपये. मी डोसेच खूप खात होते.

सकाळी वासुदेवानंद सरस्वतीच्या जन्म गांवी माणगांवला निघालो कधी विचार ही केला नव्हता इथं येणाचा. खूप प्रसन्न वाटलं कुडाळ ते माणगांव सोळा किलोमीटर आहे. त्या नंतर सिंधू दुर्गला जाण्यासाठी मालवणला गेलो. सिंधूदुर्ग बघायची माझी खूप इच्छा होती ती पूर्ण झाली. कोणास ठावूक का मला लहानपणापासून या सिंधू दुर्गाचं आकर्षण होतं. कांही ठिकाणं नावनं आणि ऐतिहासिक पाश्र्वभूमि मुळे मला आकर्षित करतात, त्यांतला हा एक सिंधूदुर्ग! सिंधु दुर्गापर्यंत पोचण्यासाठी मालवणला बोट घ्यावी लागते, बोट भरे पर्यंत अर्धातास तरी थांबावं लागतं, मी पाय समुद्रांत सोडून बसले होते. छोट्या-छोट्या मासोळ्या पायाला गुदगुल्या करून जात होत्या, बोटींत बसल्या वर माश्यांंच्या वासानं डोकं उठलं, उंच-उंच लाटां मुळे बोट खूप हेलकावे खात होती, चारीकडे अथांग पाणी आणि पाण्यांत हेलकावे खाणारी बोट, मला असले थ्रिलिंग क्षण फार आवडतात, बोट उलटली तर कित्ती छान जल समाधी मिळणार! पण तस कांही झालं नाही, आम्ही सिंधू दुर्गला पोहोचलो प्रशस्त जागा. चारी कडे कोट. आत शहाजी राजांनी बांधलेलं देऊळ आहे, बस्तीला कांही माणसं आहेत. तिथं त्यांची घर आहेत, आंत जागाNया वाटेच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडं आहेत, तिथं नारळाचं एक विचित्र झाड बघितलं. नारळाच्या झाडाला एका फांदीतून दूसरी फांदी फुटली होती झाड भ् या अक्षरासारखं हा एक अजूबाच होता, पुढे वर चढून गेलं की चारीकडे समुद्रच समुद्र अनेक रंगाचा. पाण्याचे जेवढे रंग असू शकतात तेवढे तेथे दिसत होते थोड्या थोड्या अंतरावर पाण्याचा रंग बदललेला, सगळेच रंग इतके सुंदर की बघतच राहावे. वर्णणातीत फक्त डोळेभरून बघायचे आणि डोळ्यात साठवून ठेवायचे. आणि कधी ही त्यांना डोळ्या समोर आणून आनंद लुटायचा. बाहेरच्या समुद्रात मनसोक्त खेळलो, आतील प्रेक्षणीय सगळी स्थानं बघितली. तिथं एक पार्वतीचां देऊळ आहे, ओटीचं सामान घेवून कांही बायका तिथं बसल्या होत्या, त्यांचे पूर्वज शिवाजी महाराज्यांच्या वेळेस तिथं कामाला आले होते. आज त्यांना पेन्शन मिळते किती तर फक्त सात रूपये. त्यांची ती करूण कहाणी ऐवूâन माझे डोळे नकळत पाणावले. आपल्या देशांत अश्या अन्यायाला बळी पडणारे किती तरी लोकं आहेत. आणि डोळे मिटून बसलेलं आमचे सरकार!

सिंधुदुर्ग बघितल्यावर अनेक वर्षाचे एक स्वप्न पूर्ण झाले, मनाला एक वेगळ्या समाधानाची आणी एक वेगळ्याच आनंदाची अनुभूति झाली. परतीच्या वेळेस तर बोटींत बसल्यावर कळलं की आता लाटा आणखी उंच उंच येताहेत बोट अगदी सी-सा सारखी हेलकावे खात होती खूप जोराचा वारा होता आणि खूप मज्जा येत होती. बोट किनाNयाला लागली.

सकाळी सातच्या बसने पणजी ची बस गाठली अकराला पणजीला पोहोचलो अंकोल्यासाठी अडीच वाजताची बस होती. तेव्हां टाटा सूमो करून शांता दुर्गा, मंगेशी, म्हाषसा आणि नागेशाचे मंदिर यांचे दर्शन करून परतलो. गोव्याची मंदिरं म्हणजे श्रीमंत, स्वच्छ, आकर्षक, शांत आणि पवित्र्याने ओत-प्रोत आहेत सुंदर दीपमाला आपल्याला मंदिरांत प्रवेश केल्या बरोबरच आकर्षित करतात, सोन्या चांदीच्या मूर्ती आणि सोन्या चांदीच्या पत्र्यावर केलेले सुंदर नक्काशी काम करून अत्यंत सुंदर व आकर्षक रचना केलेली आहे. स्वच्छता इकडची विशेषता, फुलांचे गजरे आणि माळा यांची तर लयलूट, मंदिराच्या आवारातूंन बाहेर यावेसेच वाटत नही. मंदिरांत चांदीच्या पालक्या, मोठाले घंटे, गर्भगृहांत मात्र सर्वांना प्रवेश नाही. त्या मुळे मंदिराचे पावित्र्य प्रकर्षाने जाणवते. एका जागी जेवण करून दोन वाजता बसस्टेंड वर पोहोचलो. संध्याकाळी अंकोला. महाराष्ट्रातून कोकण मग गोवा आता कर्नाटकात पोहोचलो. ह्या तीन्ही भागांत घरांची पद्धत अगदी सारखीच, जुनी कौलारूं घरं विशिष्ठ आकार प्रत्येक घरा समोर तुळशी वृंदावन, बस ने प्रवास करतांना, समुद्राचं सौन्दर्य किनाNयावरील गावांच सौन्दर्य मनाला मोहून टाकत होतं. अंकोल्याला पोहोचल्यावर आर्यादुर्गा मंदिरांत प्रवेश केला लगेच भक्त निवासांत खोली मिळाली, लगेच स्नानं आटोपून मंदिरांत गेलो, मंगळवार होता देवीची ओटी भरली, त्या दिवशी देवीच्या पालकीचा आनंद ही घेता आला. कुलदेवतेच्या दर्शनानं समाधान आणि आनंद तर अनुभवलाच पण कांही अनुभूतींचे प्रकटीकरण शब्द कधीच करू शकत नाही. दुसNया दिवशी गोकर्णाला गेलो, मंदिर खूप जुनं आहे नंतर समुद्र लाटांशी खेळलो. बसची वेळ कुणीतरी चुकीची सांगितल्याने बस निघून गेली होती, मग दोन तीन वेळ्या गाड्या बदलून कसे तरी अंकोल्याला पोहोचलो.

दुसNया दिवशी दर्शन घेवून प्रस्थान केलं, कर्नाटकांत हिंदीला अजिबात प्रत्युत्तर नाही. पाट्या सगळ्या कन्नड मध्ये तेव्हां कांही कळेचना मग इग्लिश मध्ये विचारल्यावर उत्तर मिळालं. मग हुगळी. बेळगांव करत पुण्याला परतलो.

प्रवास एकूण खूपच सुखकर झाला आणि एक गम्मत अशी की ह्या दहा दिवसांच्या प्रवासात आम्हांला प्रत्येकी फक्त दोन-दोन हजार खर्च आला. आज येवढा प्रवास करायचा विचार केला तर बीस तीस हजार नक्कीच लागतील. तेव्हां कालाय तस्मै नम: असे म्हणून वर्तमानात जगायचे. कधी-कधी सुखद आठवणीचा आनंद घेण्यासाठी भूतकाळ आठवत राहायचा. हहह

Error message here!

Hide Error message here!

Forgot your password?

Lost your password? Please enter your email address. You will receive a link to create a new password.

Error message here!

Back to log-in

Close