नो सिम्पथी प्लीज

  • मालती जोशी, भोपाळ

आम्ही सगळीजणं तयार होऊन हॉलमधे येऊन बसलो होतो. ताईच्या सासूबाईंना नमस्कार करून झाला होता ताईच्या नणदेला थांबल्याबद्दल थैंक्स देऊन झाले होते. ताईच्या ड्रायव्हरने आमची गाडी घासून पुसून स्वच्छ केली होती. त्याला आणि इतर नोकरमंडळींना इनाम देऊन झाले होते (दु:ख असो वा आनंद-गडीमाणसं बिचारी काम करीतच असतात) आता फक्त जीजूंची प्रतीक्षा होती.

मुलं इतकी अधीर झाली होती की त्यांनी आपल्या बॅगा आत्तापासून खांद्यावर लटकवल्या होत्या. खोटं कशाला बोलू-घरी जायला मी पण अधीर झाले होते. घर सोडून पंधरा सोळा दिवस होऊन गेले होते. ताईचं कळताच आम्ही धावत आलो होतो. तिसरा दिवस झाल्यावर माणसं हळू हळू पांगायला लागली होती. पण ताईच्या सासूबार्इंंनी मला आग्रह करून थांबवून घेतलं होतं...अग, मुलांना तुझ्यात त्यांच्या आईचं प्रतिबिंब दिसतयं, त्यांच्या समाधानासाठी चार दिवस राहतेस का?

मला नाही म्हणता आले नाही, मग हे मला आणि मुलांना सोडून निघून गेले. नंतरच्या दिवसात मुलं सावली सारखी माझ्या बरोबर होती. चौदा वर्षाची अनुष्का आणि दहा वर्षाचा अंशुमन. सतत माझ्या अवती भवती असायचे. माझी मुलं तशी लहान होती पण चौघांची छान गट्टी जमली होती. छोटा तनिष्क सतत अनुष्काच्या कडेवर असायचा अन् मोठा तनिष्क जणु अंशुदादाचे शेपूटच झाला होता.

परवा तेरावा झाला काल गंगापूजन झालं, आता निघायला हवं होतं, पण पोरांना टावूâन जायला जीव धजावत नव्हता इथून पायच निघत नव्हता. मग ह्यांनी तोडगा काढला-आपण मुलांना आपल्या बरोबर घेऊन चलू या, या वातावरणातून त्यांना बाहेर काढणं फार जरूरी आहे.

पण त्याची शाळा, त्यांचा अभ्यास बुडेल त्याच काय?

`ते फार महत्वाच नाही, या वेळी त्यांना हवा असलेला बदल महत्त्वाचा आहे. रिफ्रेश होऊन आल्यावर दुप्पट जोमाने अभ्यास करतील.'

मग सर्वसंमतीने हाच ठराव मंजूर झाला. मी वंदनाताईंना आग्रह करून थांबवून घेतलं, म्हणजे आई एकदम एकट्या पडणार नाही. आम्ही सर्व जाण्यासाठी अगदी सज्ज होतो, जीजू खाली येण्याची वाट बघत होते.

`आपण वर जाऊन भेटून यायच का'.

`ना' हे निक्षून म्हणाले-`त्यांना कदाचित आवडणार नाही. ही ....... सिम्ड सॉर्ट ऑफ अलूफ टुडे. मुलांमुळे इमोशनल झाले असतील. वी शुड लीव्ह हिम अलोन.'

`ते मला जमणार नाही. मी पटकन जाऊन येते' अन त्यांच्या उत्तराची वाट ही न बघता मी दडदड जीना चढून वर आले. पण ताईच्या खोलीशी येताच थबकले. एकदम आत जायचा धीरच होईना. मग हळुच पडदा बाजूला सारून बघितलं, खोली रिकामी होती मग तशीच थोडी पुढे गेले. खोलीला लागून असलेल्या बालकनीत जीजू आराम खुर्चीत पडलेले होते.

इतका राग आला, तिकडे आम्ही सर्व वाट बघतोय अन् -पण परिस्थितिची आठवण होताच मी मनाला सावरलं, पुढे होऊन त्यांना नमस्कार केला अन् म्हंटल-जीजू आम्ही निधतोय.

`अच्छा हेप्पी जर्नी. संभाळून जा. पोहोचल्यावर फोन करा.'

`हो नक्कीच. मी मुलांना बरोबर घेऊन चाललेय.'

`ते मला ठाऊक आहे,'

`मुलं गेली कि घर अगदी सुनं होऊन जाईल याची मला कल्पना आहे. पण त्यांना या वातावरणातून बाहेर काढणं फार आवश्यक आहे.'

`यस. दे नीड ए चैंजं बॅडली.'

`खरं तर तुम्हाला पण थोडा चेंज हवा आहे. गेला महिनाभर तुमच्यावर शारीरिक आणि मानसिक खूप ताण पडला आहे.'

`छे छे या वेळी आईला सोडून जाण्याची मी कल्पना पण करू शकत नाही.'

`ते मला माहीत आहे, म्हणूनच मी तसा आग्रह धरला नाही.' पण जेव्हां तुम्हाला सवड होईल तेव्हां माझ्याकडे चार दिवस अवश्य या. इट इज ए स्टॅडिंग इनव्हिटेशन.'

`थॅक्स, थॅक्स ए लॉट.'

`जीजूऽ जाणाNया माणसाला कल्पना सुद्धा नसते की मागे उरलेल्यांच्या आयुष्यात आपण केवढी मोठी पोकळी निर्माण करून जात आहोत. अध्र्या डावावरून कुणी उठून गेलं की समोरचा माणूस ही कसा सैरभैर होतो. तसं तुमचं झालं असणार याची मला कल्पना आहे. पण तुम्हाला असं खचून चालणार नही. मुलांसाठी तरी तुम्हाला पुन्हा ठामपणे उभं रहायला हव आहे, आता तुम्हाला त्यांच्या आईची पण भूमिका करायची आहे. म्हणूनच मी मुलांना बरोबर घेऊन जात आहे. म्हणजे तुम्हाला सावरायला थोडा वेळ मिळेल.'

बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की ते विचित्र नजरेने माझ्याकडे बघताहेत. मी एकदम बोलायचे थांबले. ते पटकन म्हणाले- `तुमचं बोलून झालयं ना' आता चालायला लागा. तो जयेश तिकडे वाट बघत असेल.

मी जागच्या जागी थिजून गेले. या सुरात ते माझ्याशी कधी बोलले नव्हते. अन् त्यांचे डोळे? शब्दांपेक्षाही तिखट धार नजरेत होती.

`जीजूऽ' मी कापNया स्वरात म्हटले-ॅ`माझ काही चुकलं का? तसं असेल तर मी माफी मागते. आय एम सॉरी.'

`तुम्हा मुलीचे हे बर आहे. सॉरी मागून मोकळं व्हायचं. तुम्हाला वाटत की शंभर गुन्हे केले तरी सॉरी म्हंटलं की सर्व माफ होत.''

``जीजू......''

``त्या दिवशी देखील तू असच सॉरी म्हणाली होतीस.''

``कुठल्या दिवशी.''

``लग्ना आधी. आपल्या लाडक्या ताईचा निरोेप घेऊन आली होतीस-त्या दिवशी''

``ती खूप जुनी गोष्ट झाली जीजू.''

``जुनी झाली म्हणुन खोटी ठरत नाही न. काय पण दिव्य संदेश होता- लग्नाच्या पांच दिवस आधी भावी वधुचा. सन्देश येतो-प्लीज लग्नाला नकार द्या. माझ मन दुसरीकडे गुंतलय.''

``तुम्हाला अजून ते सर्व आठवतंय?''

``ही गोष्ट विसरण्याजोगी आहे का अन तुइया ताईनं ती कधी विसरू दिली का?''..... स्वत:च्या आईवाडिलांसमोर तोंड उघडायची हिंमत नाही म्हणून बाईसाहेब मला संदेश पाठवतात. माझे आई बाप काय भाड्याने आणलेले होते का! त्यांना समाजात काही मानसम्मान नव्हता कां' घरात लग्नाची तयारी सुरू होती, लहान-सहान विधी चालत होते. प्रत्येक गाडीने पाहुणे येत होते अन् अशा वेळी मी लग्नाला नकार द्यायचा? काय कारण सांगणार होतो मी! अन ते कुणाला पटलं असतं का? उलट समाजात बोंब झाली असती की आम्ही अवाच्या सवा हुंडा मागितलां असेल म्हणूनच वधूपक्षानं माघार घेतली.

मी चुपचाप ती सरबत्ती ऐवूâन घेतली.

`बाय द वे त्या दिवशी विचारायच राहून गेलं, पण आता विचारतोय- समजा मी लग्नाला नकार दिला असता तर तुझी ताई त्या माणसाबरोबर पळून गेली असती का?'

``छे हो! इतकी गरज असती तर लग्नापर्यन्त वेळच आली नसतीr.''

`मग.'

`ताईला वाटलं की ठरलेलं लग्न मोडलं की थोडी बदनामी होईल. लोकांत थोडी कुजबुज होईल. पटकन् दुसरीकडे जमायला अवघड जाईल, दीड दोन वर्ष अशीच निघून जातील. तो पर्यंत काही तरी मार्ग काढता येईल.'

`वा काय प्लानिंग होतं. मला खरंच तिची दया आली होती. मी नकार देणारच होतो. पण माझा पुरूषी अहंकार फणा क़ाढून उभा ठाकला. माझ्या सारख्या श्रीमंत, सुशिक्षित, घरंदाज, श्रीमंत मुलाला एक मुलगी नकार कसा देऊ शकते. हा मला माझा अपमान वाटला. घोर अपमान. तेव्हां कल्पना नव्हती की भविष्यात या ही पेक्षा मोठ्या अपमानाला सामोर जायचं आहे.'

`म्हणजे?'

`म्हणजे तुमच्या ताईसाहेबांनी पहिल्या रात्रीच सांगून टाकलं की तुमचा फक्त या शरीरावर अधिकार आहे. मनाने मी कधीच तुमची होऊ शकणार नाही.'

`टेल मी,'

`मी खोटं सांगतो की काय? मृत व्यक्तिच्या नांवावर खोट बोलण्या इतका नीच मी नाही.'

`मग, हा प्रश्न अगदी तोंडावर आला होता. महत्प्रयासाने मीr तो गिळला. जीजूच पुढे म्हणाले- `मी म्हंटल शरीर तर शरीर. नाही तर मनाचे मला काय करायचे आहे. मग मनात शंभर योजनं अंतर ठेऊन आम्ही शरीर धर्म पाळत राहिलो. म्हणजे धर्म तिने पाळला. मी फक्त अधिकार गाजवला. पंधरा वर्ष हाँ-हाँ म्हणता निधून गेली. ती असती तर पुढची पंधरा वर्ष पण आरामात निघाली असती. नो प्रॉब्लम-' अन असं म्हणून ते हसले. त्यांचे ते हसण फारच विचित्र आणि केविलवाणं होत.

`आय एम व्हेरी सॉरी जीजू'

`सॉरी कशासाठी.'

`मला फक्त एकच दु:ख होतंय.'

`तेच विचारतीये मी'-`दु:ख कशासाठी होतंय.'

`माझ्यामुलांसाठी होतंय ग.' पण तुझं बरोबर आहे. कोवळ्या वयात बिचाNयांंची आई त्यांना सोडून गेली. थोड दु:ख माझ्या आईसाठी पण करू शकतेस? या वयात तिची लाडकी सून तिची फसवणूक करून गेली आहे. पण माझ्यासाठी दु:ख करत असशील तर त्याची काही गरज नाही. माझं काहीही नुकसान झालेल नाही. जे माझं कधी नव्हतं ते हरपल्याचा शोक मी कां करावा! सो- नो सिम्पथी प्लीज!'

त्यांचा स्वर अत्यंत निर्वाणीचा होता त्यामुळे पुढे काही बोलताच आलं नाही. बोलण्यासारख काही शिल्लकच नव्हतं. मी मुकाट्याने माघारी वळले अन् जिना उतरू लागले. त्यांचा तो स्वर कानात घुमत होत -नो सिम्पथी प्लीज.

अन् आमच्या ताईसाहेब जन्मभर सहानुभूतींची भूक बाळगून होत्या. माहेरी आली की पावलो पावली जाणवून द्यायची ती तिच्यावर किती अन्याय झाले आहेत. आई-बाबानां तिने सतत अपराधाची टोचणी दिली. त्यांना कधीही मुक्त होऊ दिले नाही आणि म्हणायची स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी माझा बळी दिला गं.

ताई! बळी तुझा गेला नाही. या सज्जन माणसाचा गेला. नाही, जो अपराध त्याने केलाच नाही त्याची शिक्षा जन्मभर भोगत राहिला, पण कधी कुणाला सुगावा लागू दिला नाही की त्यांच्या दाम्पत्यजीवनाला इतक मोठ भगदाड पडलं आहे.

आजसुद्धा मी तसली मुर्खासारखी बडबड केली नसती तर जीजूंनी आपली जखम उघडी करून दाखवली नसती. ती दाखवताना सुद्धा त्यांची ताकद होती - नो सिम्पथी प्लीज!

जीजू, तुम्हाला सिम्पथी देण्याची माझी लायकी तरी आहे का!

मला तर ताईचीच कणव येतेय. कुठल्यातरी मृगजळामागे आयुष्यभर धावत होती, घरी असलेला हा अमृतकुंभ तिला दिसलाच नाही कां! हहह

Error message here!

Hide Error message here!

Forgot your password?

Lost your password? Please enter your email address. You will receive a link to create a new password.

Error message here!

Back to log-in

Close