आम्ही भारतवासी

  • मीना खोंड, हैद्राबाद

आम्ही भारतवासी

आम्ही भारतवासी
भारतीय निवासी
भारतीय आम्ही
भारतीय आम्ही!.......

शिख ईसाई मुस्लिम हिंदु
भारती सारे बंधु बंधु
'आम्ही सरि एकऽ नारा अमुचा
मानवता धर्म आमुचा
वचन निभाऊ आम्ही......

विभाजनाचा बाद नाही
भाषेचा विवाद नाही
'राष्ट्रीय एकताऽ नारा अमुचा
'बंधुभावऽ धर्म अमुचा
प्रगती पथावर आम्ही.....

शत्रुचे कधी भय नाही
विभाजन कदापि नाही
'अखंड भारतऽ नारा अमुचा
'राष्टरक्षा धर्म आमुचा
देशासाठी मरू आम्ही.....

भारतात अध्यात्म प्रकाश
विज्ञानाचा प्रगत विकास
'स्वतंत्र भारतऽ नारा अमुचा
'देश सेवाऽ धर्म अमुचा
देशासाठी जगू आम्ही.....

– मीना खोंड, हैद्राबाद

Error message here!

Hide Error message here!

Forgot your password?

Lost your password? Please enter your email address. You will receive a link to create a new password.

Error message here!

Back to log-in

Close